*डॉ. स्मिता काळे यांनी 'सकाळ'च्या स्पर्धेत सहभागी व्हा आणि भरपूर बक्षीस मिळवा, आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे अंकासाठी संपर्क साधा असे आवाहन केले*

- महिलांच्या कर्तृत्वाला वाव मिळावा म्हणून "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या "मैत्रीण' सदरावर आधारित स्पर्धा सुरू करण्यात येत आहे. एकूण 60 दिवसांच्या कालावधीत "सकाळ' व "ऍग्रोवन'मध्ये महिलांसाठी मैत्रीण नावाचे खास सदर प्रसिद्ध होणार आहे.
- त्यात अलंकार (दागिने), त्वचा व केसांचे सौंदर्य, फॅशन, किचन गॅजेट्स, आरोग्य संवाद, योगासने, खाद्यपदार्थ, महिलांचे विषय आदींवरील लेखांचा समावेश असेल.
- त्यातील मजकुरावर आधारित प्रश्नांचा स्पर्धेत सहभाग असेल.
- 5 नोव्हेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 असा स्पर्धेचा कालावधी आहे.
- त्यासाठी महिलांनी सकाळ आणि ऍग्रोवनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या स्पर्धेच्या प्रवेशिकेच्या तक्त्यात कूपन चिकटवावे लागणार आहे.